टीम महाराष्ट्र देशा: पूर्वीच्या काळी काही आनंदाची वार्ता आली तर गोड पदार्थ म्हणून गुळाचे सेवन करत. त्याचबरोबर आपल्या आजी आजोबांच्या काळात जेवल्यानंतर गुळ खाण्याची देखील पद्धत होती. पण आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारचे गोड पदार्थ उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आता गुळ खायला आपल्याला नको वाटते. पण घरातील वडीलधारी मंडळी आजही जेवणानंतर गुळ खाण्याचा सल्ला देतात कारण जेवणानंतर गुळ खाल्ल्याने शरीराला त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. गुळ खायला गोड आणि चविष्ट असतो त्याचबरोबर गुळ शरीरातील आयरन ची कमतरता देखील पूर्ण करतो.
जेवण झाल्यानंतर गुळ का खावा?
तुम्ही गुळ केव्हाही खाऊ शकतात पण जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होऊन अन्न पचायला सोपे जाते. जेवणानंतर गुळ खाल्ल्याने शरीरातील आयरन कमतरता देखील पूर्ण होते. त्याचबरोबर गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, विटामिन सी इत्यादी सारखे पोषक घटक आढळतात. जे लोक नियमितपणे गुळाचे सेवन करतात ते पोटाच्या आजारांपासून दूर राहतात आणि त्यांचे चेहऱ्यावरची चमक देखील वाढते.
नियमित गुळाचे सेवन करण्याचे फायदे
पचनक्रिया व्यवस्थित राहते
जेवणानंतर दररोज गुळ खाल्ल्याने आपली पचनक्रिया व्यवस्थित होऊन जेवण पचण्यास मदत होते. त्याचबरोबर अपचनाच्या समस्येपासून देखील आपण दूर राहतो. गुळात आढळणारे पोषक घटक अन्न पचवण्यास मदत करतात त्यामुळे जेवणानंतर गुळ खाणे नेहमी फायद्याचे ठरू शकतो.
शरीरातील हाडे मजबूत बनतात
गुळ खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध होते. त्यामुळे हाडे मजबूत करायची असेल तर नियमितपणे गुळाचे सेवन केले पाहिजे. नियमित जेवणानंतर गुळ खाल्ल्याने स्नायूचे आजार देखील दूर होऊ शकतात.
नियमित गुळाचे सेवन प्रतिकारशक्ती वाढवते
गुळामध्ये विटामिन सी आणि झिंक मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे रोज गुळ खाल्ल्यास रोज प्रतिकारशक्ती मजबूत बनवून आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. त्याचबरोबर नियमित गुळ खाल्ल्याने सर्दी खोकल्यासारखे आजारापासूनही आपण दूर राहतो.
नियमित गुळ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते
नियमित गुळाचे सेवन वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. जेवणानंतर गुळ खाल्ल्याने तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्याला सामोरे जावे लागणार नाही. कारण गुळामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम आढळते जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane | हा चिखलातला डुक्कर, त्याला चिखलातच लोळवणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांवर घणाघात
- Skin Care Tips | अंडी आहेत त्वचेच्या ‘या’ समस्यांसाठी रामबाण इलाज
- Aditya Thackeray । “एकनाथ शिंदेंच्या बाबतीत ‘ती’ एक चूक आम्हाला महागात पडली”; आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
- Diwali 2022 | दिवाळी लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त कधी आहे त्याचबरोबर घरी आणि ऑफिसमध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे? जाणून घ्या
- Anil Deshmukh । अनिल देशमुखांना मोठा झटका; सीबीआय प्रकरणातील जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला