Curd Benefits | रोज सकाळी नाश्त्यामध्ये दह्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Curd Benefits | टीम महाराष्ट्र देशा: दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बहुतांश लोक दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात दह्याचे सेवन करतात. परंतु सकाळच्या नाश्त्यामध्ये दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन, आयरन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, फॉलेट इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे दह्याचे दररोज सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स आढळून येतात, जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर दररोज सकाळी नाश्त्यामध्ये दह्याचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Curd Benefits)

दररोज नाश्त्यामध्ये दह्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्याचबरोबर दह्याचे सेवन केल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Curd Benefits)

दह्यामध्ये आढळणारे गुणधर्म पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. दह्याचे सेवन केल्याने बद्धकोष्टता, जुलाब, पोट दुखी यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर दह्याचे दररोज सकाळी सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पचनाच्या समस्या दूर होऊ शकतात. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी त्यांच्या नाष्ट्यामध्ये दह्याचा समावेश केला पाहिजे.

हाडे मजबूत होतात (Bones become stronger-Curd Benefits)

सकाळी नाश्त्यामध्ये दह्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होऊ शकतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि फॉस्फरस आढळून येते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. दह्याचे सेवन केल्याने सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.

सकाळी नाश्त्यामध्ये दह्याचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

पोहे (Poha-Belly Fat)

पोहे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी आढळून येते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. त्यामुळे पोह्यांचे सेवन केल्याने पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. पोहे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे पोह्यांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

अंडी (Egg-Belly Fat)

अंड्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट इत्यादी गुणधर्म उपलब्ध आहे. त्यामुळे अंड्याचे सेवन केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकतो. त्याचबरोबर अंडी खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार सहज दूर होऊ शकतात. अंड्याचे सेवन केल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात.

उपमा (Upma-Belly Fat)

उपमा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. उपमा खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये उपम्याचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.