टीम महाराष्ट्र देशा: आजकाल केस गळणे (Hair Fall), केस खराब (Hair Damage) होणे ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे आणि प्रदूषणामुळे केसांच्या समस्या निर्माण होतात. केस वाढीसाठी आणि केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा अवलंब करत असतो. केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही अनेक वेळा बाजारामध्ये उपलब्ध असलेले उत्पादके वापरत असतात. ही उत्पादने अनेकवेळा आपल्या केसांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे नैसर्गिक पद्धती वापरून केसांची निगा राखली गेली पाहिजे. त्याचबरोबर योग्य आहाराचे सेवन केल्याने देखील केसांची व्यवस्थितरित्या निगा राखली जाऊ शकते. म्हणूनच केसांची निगा राखण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे, याबद्दल आम्ही या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.
हेझलनट
हेझलनटमध्ये झिंक, विटामिन ई, ओमेगा 3 ॲसिड आणि मॅग्नेशियम इत्यादी घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. नियमित हेझलनटचे सेवन केल्याने केस निरोगी राहून केस वाढण्यास मदत होऊ शकते. हेझलनटचे संतुलित प्रमाणात सेवन केल्याने केसांची वाढ जलद होऊ शकते.
बदाम
केसांच्या चांगल्या वाढीसाठी बदाम खूप महत्त्वाचे ठरू शकते. नियमित पाच ते सात भिजवलेल्या बदामाचे सेवन केल्याने केसांना पोषण मिळू शकते. कारण यामध्ये विटामिन ई, फॅटी ॲसिड आणि फॉलेट मुबलक प्रमाणात आढळते. हे पोषक घटक केसांसाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे नियमित बदामाचे सेवन केल्याने केस निरोगी राहू शकतात.
अक्रोड
अक्रोड हा एक केसांच्या समस्यांसाठी रामबाण उपाय करू शकतो. कारण अक्रोडामध्ये विटामिन ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिडियासारखे पोषक घटक आढळतात. त्यामुळे अक्रोडाचे सेवन खाल्ल्याने केसांना पुरेसे पोषण मिळू शकते. परिणामी तुमच्या केसांची वाढ जलद होऊ शकते.
शेंगदाणे
नियमित संतुलित प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्याने केसांना खूप फायदा मिळू शकतो. शेंगदाण्यांमध्ये उपलब्ध असलेले अनेक पोषक घटके केस गळतीची समस्या थांबवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे नियमित शेंगदाण्यांचे सेवन केल्याने केस निरोगी राहू शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Mahaparinirvan Diwas | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिवस का साजरा केला जातो?, जाणून घ्या
- Cloves | हिवाळ्यात रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- T-20 World Cup | टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी युवा महिला संघाचे नेतृत्व करणार शेफाली वर्मा
- Uddhav Thackeray | “सरकार चालविण्यापासून ते…”, उद्धव ठाकरेंची सरकार चालवण्याची तयारी
- MVA | सरकारविरोधात 17 डिसेंबरला महाविकासआघाडीचा महामोर्चा