सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील १४ ग्रामपंचातींच्या बांधकामास मंजुरी!

सिल्लोड : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड- सोयगाव मतदार संघातील १४ ग्रामपंचायतींच्या कार्यालयांच्या बांधकामास ग्रामविकास मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत ही मान्यता देण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेनंतर राज्यमंत्री सत्तार यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

अनेक ग्रामपंचायतींना स्वतःच्या हक्काच्या कार्यालयासाठी जागाच नव्हती. या ग्रामपंचायतींना हक्काची जागा मिळवून देण्याचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस होता. तसा शब्दही त्यांनी संबंधित ग्रामस्थांना दिला होता. ग्रामपंचायतींच्या कार्यालयांच्या बांधकामास परवानगी मिळाल्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. तसेच या निर्णयानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी समाधान व्यक्त केले.

सिल्लोड तालुक्यातील १३ आणि सोयगाव तालुक्यातील एक अशा १४ ग्रामपंचायत कार्यालयांना राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत बांधकामाची परवानगी मिळाली आहे. त्यात सिल्लोड तालुक्यातील धोत्रा, जळकी बाजार, म्हसला खुर्द, बोरगाव सारवणी, गव्हाली तांडा, मुखपाठ, आमसरी, रहिमाबाद, गेवराई शेमी, अंधारी, वसई जळकी, नाणेगाव, जंजाळ आणि सोयगाव तालुक्यातील घाणेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या