अयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई फुले

RamMandir

टीम महाराष्ट्र देशा- अयोध्येत रामाचं नाही तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा अशी मागणी भाजपच्या बहराइचच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी केली आहे. बुद्ध धर्म जगातील सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचं प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत रामाचं मंदिर बांधण्याची तयारी सुरू केल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त जमिनीवर रामाचं मंदिर मुळी कधी नव्हतेच असा युक्तीवाद सावित्रीबाई फुले यांनी केला आहे.’ वादग्रस्त ठिकाणी झालेल्या उत्खननात बुद्धाच्या मूर्ती सापडल्या आहेत .तसंच इतर ही वस्तू हेच सांगतात की तिथे रामाचं नाही तर बुद्धाचं मंदिर होतं. त्यामुळे अयोध्येत बुद्धाचं भव्य दिव्य मंदिर उभारावं अशी मागणी त्यांनी केली आहे.