अवघ्या ४५ दिवसात मिळणार बांधकाम परवाना

building pmrda

पुणे: आता बांधकाम परवाना केवळ 45 दिवसांत मिळणार आहे. ११ जुलै रोजी जारी केलेल्या आदेशाची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे, अशी माहिती पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी दिली.

परवाना मिळवन्याची सर्वात किचकट प्रकिया म्हणजे बांधकाम विभागातुन परवाना मिळवण्याची होय. मात्र आता शासनाने बांधकाम परवाना देण्याचा कालावधी 45 दिवसांचा केला आहे. त्यामुळे त्याचा फायदा बांधकाम करणाऱ्या संबंधितांना होणार आहे. मिळकतदाराने अर्ज केल्यानंतर बांधकाम परवाना देण्यासाठी 30 दिवस, जोता तपासण्यासाठी सात दिवस आणि वापर परवाना देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परिपूर्ण असणारे अर्ज या कालावधीत बांधकाम परवान्याची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचना शासनाने संबंधित विभागांना दिल्या असल्याची माहितीही गित्ते यांनी दिली. त्यामुळे आता होणारा मनस्ताप कमी होणार आहे व अवघ्या४५ दिवसात परवाना मिळणार आहे.