‘देशात कुठेही संविधान मानलं जात नाही याची खंत वाटते’

टीम महाराष्ट्र देशा- ज्यांचे दिल्लीवर राज्य आहे त्यांच्याच राज्यात संविधान जाळण्यात आलं. मात्र एकालाही अटक करण्यात आली नाही. मात्र जालन्यामध्ये मनुस्मृती जाळली तेव्हा लगेच अटकसत्र सुरू केले. अशा विचारांचे लोक सध्या राज्य करीत आहेत. संविधानाप्रमाणे सर्व नागरिकांना देशात स्वातंत्र्य आहे. या राज्यात, देशात कुठेही संविधान मानलं जात नाही याची खंत वाटत असल्याचं मत समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंआहे.

नायगाव, ता. खंडाळा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे व मान्यवर उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ?

सगळ्यांची मुस्कटदाबी केली जाते. इतकच नव्हे तर प्रसार माध्यमांची सुद्धा मुस्कटदाबी होत आहे. ही या देशाची खंत आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ मुस्कटदाबी सहन करत असेल तर राज्यातील सर्व सामान्य जनतेसह लोकप्रतिनिधींची कशा पद्धतीने मुस्कटदाबी होत असेल याचा विचार आता जनतेने करावा.संविधानाप्रमाणे सर्व नागरिकांना देशात स्वातंत्र्य आहे. या राज्यात, देशात कुठेही संविधान मानलं जात नाही.