राज्यघटना वाचवण्यासाठी ख्रिश्चन बांधवांना राजकारणात सक्रिय व्हावे लागेल – आर्चबशिप फिलीप नेरी

पणजी : गोव्याचे आर्चबशिप फिलीप नेरी फेराओ यांनी आपल्या वार्षिक पत्रात राज्यघटना धोक्यात असल्याचा आरोप केलाय. सध्या देशात अराजकता माजली असून, विकासाच्या नावाखाली मानवी हक्कांना पायदळी तुडवलं जात असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे. तसेच राज्यघटना वाचवण्यासाठी ख्रिश्चन धर्माचे अनुयायी राजकारणात सक्रिय होण्याची गरज असल्याचं आव्हान देखील त्यांनी केलंय.

Loading...

“आज आपली राज्यघटना धोक्यात असल्यानेच अनेकांना असुरक्षित वाटत आहे. निवडणूक जवळ येत असल्या कारणानेच आपण आपली राज्यघटना समजून घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणं गरजेचं असून, त्याची सुरक्षा करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे”, असं फिलीप नेरी फेराओ यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान यापूर्वी दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी देखील असंच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. देशाची राज्यघटना धोक्यात आली असून, मोदींचा पराभव करायचा असेल तर, उपवास करण्याचा सल्ला दिला होता.Loading…


Loading…

Loading...