…त्यामुळेच देशहित मागे पडत आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य

…त्यामुळेच देशहित मागे पडत आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य

PM Narendra Modi

नवी दिल्ली: संविधान दिनानिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. शिवसेनेनी देखील या कार्यक्रमाला बहिष्कार टाकला असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारकडून हे संविधान पायदळी तुडवलं जात असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.

विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असला तरी देखील हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाषण देखील केले. विविधतेने नटलेला देश, अनेक भाषा, पंथ आणि राजेरजवाडे हे सर्व असूनही संविधानाच्या माध्यमातून सर्व देशाला एका बंधनात बांधण्याची योजना बनवणे कठीण होतं. आजच्या संदर्भात त्याकडे पाहिलं तर संविधानाचं एक पानही आपण लिहू शकलो असतो का, अशी शंका उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिपादन केलं.

स्वातंत्र्याच्या आंदोलनाची छाया, देशभक्तीची आग, फाळणीचं दु:ख हे सर्व असूनही त्यावेळी देशहित सर्वोच्च हाच सर्वांच्या मनात मंत्रं होता. असं सांगतानाच त्यावेळी राष्ट्र पहिलं होतं. परंतु काळानुसार राजकारणाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे कधी कधी देशहितही मागे पडतं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. संविधान निर्मित्यांचेही स्वत:चे काही विचार असतील. त्यांचीही विचारधारा असेल. त्याला धारही असेल. पण तरीही त्यांनी राष्ट्रहित सर्वोच्च मानून संविधान लिहिलं ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या: