मुंबई : मागच्या काही दिवसांपासून केतकी चितळे (Ketaki Chitale) हे नाव सतत वादात आहे. शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकी चितळे चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर केतकीला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. त्यानंतर केतकीचा कोठडीतील दिवस वाढतच गेले. गेली अनेक दिवस जामीनासाठी केतकी प्रयत्न चालू होते . अखेर तिला या प्रकरणात जामीन मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
केतकीने शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तिला अटक करण्यात आली होती. दरम्यान केतकीने जामीन मिळावा म्हणून वकिलामार्फत न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने केतकीला जामीन दिला. २० हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
केतकी चितळे याच्याआधी देखील तिच्या वादग्रस्त विधानांमुळे खूप वेळा चर्चेत आली होती. पण इतक्या प्रमाणात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. केतकीवर आधी शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे आणि नंतर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला. यामुळे केतकीला खुप दिवस कोठडीत काढावे लागले. पण आता दोन्ही प्रकरणामध्ये केतकीला जामीन मंजूर झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :