औरंगाबादकरांना दिलासा; जायकवाडीत ४८५ घनफूट वेगाने पाणी दाखल

jayakwadi dam

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या जायकवाडीतील नाथसागरात वेगाने पाणी दाखल होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे नदीपात्रात दाखल होणाऱ्या पाण्याचा वेग वाढला आहे. सध्या जायकवाडी धरणात ३५ पूर्णांक ५९ टक्के पाणी साठा असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागाने दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह पुढील अनेक जिल्ह्ये नाथसागर जलाशयावर अवलंबून असतात. या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी अद्याप तसा पाऊस मराठवाड्यात सर्वदूर पडलेला नाही. त्यात जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक वाढली असल्याचे वृत्त ‘औरंगाबाद आकाशवाणी’ने दिले आहे.

जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पिण्याचा पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सूटतो. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र देखील या पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे जायकवाडीत पाण्याची आवक सुरू झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास त्याचा फायदा जायकवाडी प्रकल्पाला हाेतो. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्ये दुष्काळग्रस्त असल्याने या पाण्यावरच मराठवाड्यातील तहाण अवलंबून असते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP