सर्वसामान्यांना दिलासा! दसरा-दिवाळीच्या काळात महागाई होणार कमी

महागाई

मुंबई : राज्यभरात सणासुदीची लगबग सुरु झाली असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु आता महागाईबाबत नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतात किरकोळ महागाईचा दर हा मागील ५ महिन्यात सर्वाधिक कमी म्हणजे ४.३५ टक्के इतका करण्यात आला आहे. मात्र अर्थतज्ज्ञांनी येणाऱ्या काळात महागाई दरात चढ- उतार होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात औद्योगिक विकास दर हा ७.१ टक्के इतका होता. तो आता वाढला असून या ऑगस्टमध्ये तो ११.९ टक्के इतका झाला आहे. यामुळे कोरोना काळात मंदावत असलेली भारतीय अर्थव्यवस्था आता रुळावर येताना दिसून येत आहे. महागाई दर हा उर्जा, धातू आणि लॉजिस्टिक कॉस्ट यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भाजीपाल्याच्या महागाई दरात घट झाली असून ती 22.5 टक्क्यांवर आली आहे. यामुळे आता नागरिकांची दसरा-दिवाळी गोड होणार असे म्हणण्यास काही हरकत नाही.

खाद्य पदार्थांच्या महागाई दरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे नागरीककांना याचा काहीसा दिलासा मिळाला आहे. खाद्य पदार्थांच्या महागाईचा दर हा कन्झ्युमर फूड प्राईस इन्डेक्स यावर आधारित राहत आहे. खाद्य पदार्थांचा महागाई दर हा मागील ७ महिन्यात सर्वात कमी आहे. या ऑगस्टमध्ये तो ३.१ टक्के इतका होता. यामध्ये आता ०.६८ टक्क्यांची घट करण्यात आली आहे. भाजीपाल्याच्या महागाईच्या दरात मोठी घट झाली आहे. कोअर इन्फ्लेशनमध्ये खाद्य पदार्थ, इंधन दर यांचा समावेश नसतो.

महत्वाच्या बातम्या