कलम-३७० चा परिणाम; भारतीय कंपन्यांना क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क देण्यास पाकिस्तान सरकारचा नकार

मुंबई : ऑगस्ट २०१९ मध्ये नरेंद्र मोदी सरकारने ३७० कलम रद्द करण्यात आले. यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील संबध ताणले गेले. हा प्रश्न दोन्ही राष्ट्राच्या संसदेत चर्चिला गेला. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तान सरकारने अक्षेप नोदंविला होता. आता याचा परिणाम क्रिकेट प्रसारणावर होत आहे.

आगामी जुलै महिन्यात पाकिस्तानचा संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तानचा संघ ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. या मालिकेच्या प्रसारणाचे हक्क हे भारतीय वाहिन्याना देण्यात यावे असी मागणी पाकिस्तान टेलिव्हिजनने केली होती. मात्र ही मागणी पाकिस्तान सरकारने फेटाळली. पाकिस्तान सरकारचे सूचना व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावत म्हणाले की, ‘भारतीय कंपन्यांना प्रसारण हक्क देण्याचा पी टिव्हीने ठेवलेला प्रस्ताव आम्ही अमान्य करत आहोत. यापूर्वीच इम्रान खान सरकारने सांगितले होते की जम्मू-काश्मीरमधून हटवलेल्या कलम ३७० निर्णयाचा फेरविचार झाल्यानंतरच उभय देशातील संबंध पूर्ववत होतील.’

यावेळी बोलताना फवाद चौधरी पुढे म्हणाले की,’दक्षिण आशियातील सर्व क्रिकेट प्रक्षेपणावर स्टार व सोनी या दोन चॅनेलची मक्तेदारी आहे. तर भारतीय कंपन्यांशी करार नसेल तर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड ही मालिका पाकिस्तानमध्ये प्रसारित होणार नाही. मात्र यावर आपण इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड व इतर परदेशी कंपन्यांकडून प्रसारण हक्क मिळवून उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील राजकीय वैर व सीमावादामुळे गेल्या अनेक वर्षापासुन दोन्ही संघात क्रिकेट मालिका आयोजीत केली नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या

IMP