आम्ही सुद्धा एनडीएतून बाहेर पडू , अजून एका मित्र पक्षाचा शहा-मोदींना इशारा

टीम महाराष्ट्र देशा : मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी आम्ही लवकरच एनडीएतून बाहेर पडू, असं विधान केलं आहे. भाजपाला एक एक मित्र पक्ष सोडून जात असताना कॉनराड संगमा यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. NDAतून बाहेर पडण्याच्या योग्य वेळेची आम्ही वाटत पाहत आहोत, असं म्हणत त्यांनी भाजपाला एक प्रकारे सूचक इशारा दिला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून संगमा आणि मोदी सरकारमध्ये वाद आहे. या विधेयकावरून अनेक मित्र पक्षांनी भाजपाला एनडीएतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. जर केंद्र सरकारनं हे विधेयक राज्यसभेत आणलं तर आम्ही तात्काळ एनडीएतून बाहेर पडू, असंही संगमा म्हणाले आहेत. एनपीपीच्या पाठिंब्यावरच मणिपूर आणि अरुणाचलमध्ये भाजपाचं सरकार आहे. तर मेघालयमध्ये एनपीपीच्या सरकारला भाजपाचा पाठिंबा आहे. तसेच संगमा यांनी पूर्वोत्तर राज्यांतील दुसऱ्या पक्षांनाही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचं अपिल केलं आहे. लोकसभेत मंजूर झालेले हे विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे

Loading...

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
माझी बदनामी करणारे 80 टक्के मराठा तरुण, आज मराठा समाजात जन्मल्याची लाज वाटते : तृप्ती देसाई
संज्याला मी चर्च गेट स्टेशनवर फाटक्या कपड्यात पेटी वाजवताना बघितलं होतं ; आज खात्री झाली : निलेश राणे
कोरोना इफेक्ट् : भारतात कंडोमच्या विक्रीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
इटलीनंतर 'हा' देश सापडला कोरोनाच्या विळख्यात, चीनलाही टाकले मागे