औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा

congress

औरंगाबाद – औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व अनाधिकृत वसाहती 2015 पर्यंत गुंठेवारी अधिनियमांतर्गत अधिकृत करण्यात यावी अशी मागणी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. यासह विविध मागण्या संदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन दिल्याचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी सांगितलं. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते.

औरंगाबाद की संभाजीनगर या संदर्भात पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केली असून तीच आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळाची तयारी करत असून सर्व 115 वार्डामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचं काँग्रेसचे नेते प्रकाश मुगदीया यांनी सांगितलं.

औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी असून या शहरामध्ये पर्यटन विकसित करण्यासंदर्भात काँग्रेसने आराखडा तयार केला असून लवकरच हा आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध प्रश्नांवर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी काँग्रेसने दिला आहे. औरंगाबाद शहरातील कॅन्सर हॉस्पिटल हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे झाले आहे. या हॉस्पिटलला विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी औरंगाबाद काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या