fbpx

‘महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागांमध्ये चौपट वाढ होणार’

congress-flag

टीम महाराष्ट्र देशा : १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान आज पार पडले. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत असणाऱ्या पक्षांच्या संभाव्य विजयी उमेदवारांची आकडेवारी बाहेर येऊ लागली आहे.

दरम्यान, टीव्ही 9 सी व्होटरच्या एग्झिट पोलनुसार महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागांमध्ये चौपट वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ 2 जागा मिळाल्या होत्या, यंदा काँग्रेसला 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसने यंदा 26 तर राष्ट्रवादीने 22 जागा लढल्या आहेत. त्यांनी मित्रपक्षांना आपआपल्या कोट्यातील 2-2 जागा सोडल्या. त्यानुसार काँग्रेसला 26 पैकी 8 जागी विजय मिळेल असा अंदाज Tv9 C voter exit poll चा आहे.

सकाळ माध्यम समूहाने महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात सर्वे घेण्यात आला. यात सॅम्पल सर्वे घेण्यात आला. त्यात सकाळच्या वार्ताहरांच्या मदतीने हा सर्वे करण्यात आला. या सर्वेत आलेल्या निकालानुसार भाजप-युती फटका बसताना दिसत आहे.

सकाळ आणि साम वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा युतीलाच मिळतील, तर आघाडीनेही जोरदार लढत दिल्याचे चित्र आहे. युतीला 29 आणि आघाडीला 19 जागा मिळण्याचा अंदाज साम वाहिनी आणि सकाळच्या एक्झिट पोलने वर्तविला आहे.