पूर आला तेव्हा फडणवीसांना आधारकार्डवर रेशन देण्याची कल्पना का सुचली नाही ?

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधारकार्डवर रेशन द्या हा आग्रह धरणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याची आठवण महाराष्ट्र पूरस्थितीचा सामना करत असताना का झाली नाही? फडणवीसांना लाभार्थ्यांच्या यादीत स्वतःचं नाव घालायचं आहे का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

तसेच भाजप नेते राज्य सरकारला मदत करण्याऐवजी जनतेत असंतोष निर्माण होईल असे प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही त्यांनी यांनी केली.

राज्यातील प्रत्येक गरिबाचे पोट भरले पाहिजे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. राज्यातील रेशन व्यवस्थेच्या ५२४२४ शिधावाटप केंद्रातून १ कोटी ६० लाख रेशनकार्ड धारकांना धान्य वाटप केलं जातं.

रेशनवरील धान्य वाटपात देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची स्थिती अधिक चांगली आहे, असा दावाही सचिन सावंत यांनी केला आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही असे बहुतांश लोक स्थलांतरीत आहेत. त्या सर्वांकरीता राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारने जवळपास ४५३२ रिलीफ कॅम्प उभारले असून जवळपास ५ लाख मजुरांना दोन वेळचं जेवण आणि एक वेळ नाश्ता देण्यात येत आहे, असंही सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.

हेही पहा –