काँग्रेसची धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर : महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा

sharad pawar and uddhav thakrey

सोलापूर : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

कार्यकर्त्यांच्या सभा, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या योजना, नेत्यांचे दौरे, बैठका यामुळे राजकीय वातावरण तापलं असून कोरोनानंतरच्या राज्यातील या पहिल्याच निवडणुका आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघडीची बैठक आज सोलापुरात पार पडली.

महाविकास आघाडीच्या या बैठकीत सुशीलकुमार शिंदे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. बैठकीत बॅनरवर माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने समर्थकांनी गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसमधील नाराजी नाट्य उघडकीस आलं आहे. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.

सुशीलकुमार शिंदे समर्थकांच्या गोंधळानंतर राज्यमंत्री सतेज पाटील स्वत: खाली उतरले. काही काळ बैठकीत एकचं गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. सुशीलकुमार शिंदे समर्थकांनी जोरदार नारेबाजी करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासमोर निषेध नोंदवला. इतकंच नाही तर, सोलापूरच्या विद्यमान आमदार व सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांचा देखील फोटो नसल्याने समर्थक अधिकच नाराज झाल्याचं दिसून आलं.

महत्वाच्या बातम्या