आगामी लोकसभेमध्ये कॉंग्रेसची नवी खेळी

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष हा चांगलाच अपयशी ठरला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकात कॉंग्रेस वेगळीच खेळी खेळत असल्याच चित्र दिसत आहे. काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अनुभवी राजकारण्यांन बरोबरच सिनेअभिनेत्यांच्या लोकप्रियतेचा देखील फायदा घेणार असल्याच दिसत आहे. या खेळी नुसारच मुंबईमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याला तिकीट देण्यात येणार असून त्या अभिनेत्याच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.

या निवडणुकीत गोविंदाचा भाचा व प्रसिद्ध विनोदवीर कृष्णा अभिषेक याला काँग्रेस उत्तर मुंबईतून लोकसभेचे तिकीट देणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये सध्या उत्तर मुंबईत उमेदवारी देण्यासाठी एकही मोठा नेता किंवा प्रसिद्ध चेहरा नसल्यामुळे काँग्रेसने आता कृष्णाला उमेदवारी देण्याचे ठरवले असल्याचे समजते. या मतदार संघातून २००४ साली गोविंदाने देखील निवडणूक जिंकला होता. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता कृष्णाला उमेदवारी देण्याचे ठरवले असल्याचे समजते.

देशात असणाऱ्या निवडणुकीच्या वातवरणात एखादा सिनेकलाकार पडद्यावर नदिसता तो जर राजकीय व्यासपीठावर दिसला तर आश्चर्य वाटण्याची काहीच गरज नाही. कारण राजकारण आणि सिनेकलाकार यांच चांगलच साटलोट असल्याच आपल्याला पूर्वापार पासून दिसत आहे. प्रत्येक निवडणुकीला कोणता तरी कलाकार कोणत्यातरी पक्षात प्रवेश करतो. याआधी देखील शत्रुघन सिन्हा , राज बब्बर, गोविंदा , सुनील दत्त, स्मृती इराणी , हेमा मालिनी , किरण खैर आदी अनेक सिनेअभिनेत्यांनी सिनेक्षेत्रा बरोबरचं राजकारणात देखील आपल वेगळ स्थान निर्माण केल आहे.

2 Comments

Click here to post a comment