लोकसभेची सेमीफायनल- तीन राज्यात कॉंग्रेसची बहुमताकडे आगेकूच

टीम महाराष्ट्र देशा – आज जाहीर होत असलेल्या पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. काँग्रेसने राजस्थानमध्ये १९५ पैकी ११० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर छत्तीसगडमध्ये ९० पैकी तब्बल ६० जागांवर आघाडी घेतली आहे. मध्यप्रदेश मध्ये मात्र काँग्रेस-भाजपा यांच्यात जोरदार ‘काँटे की टक्कर’ सुरु आहे.

राजकीयदृष्ट्या महत्वाचे नसलेल्या मिझोराममध्ये स्थानिक एमएनएफ आघाडीवर आहे तर तेलंगणात टीआरएसने बहुमताचा आकडा पार केला आहे. अंतिम निकाल यायला अजून कालावधी बाकी आहे, पण मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोण सत्ता मिळवतं, हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.