कॉंग्रेसचा अकोल्यामध्ये छुपा डाव

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्ष राज्यभरातील दलित मत मिळविण्यासाठी एमआयएमसोबत युती केलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पण त्यावर मात्र प्रकाश आंबेडकरांनी अद्याप कोणत्याच प्रकारच भाष्य केले नाही.

प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे गेले काही दिवस प्रयत्न चालू आहेत. मात्र, आंबेडकरांनी एमआयएमलादेखील महाआघाडीत घेण्याची अट घातली. ही अट काँग्रेसनं अमान्य केली. भाजपाला सत्तेपासून रोखायचं असल्यास धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळावं लागेल, असं राज्यातील काँग्रेस नेत्यांना वाटतं. त्यामुळेच काँग्रेसकडून आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदारसंघात पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. अकोल्यात भारिप बहुजन महासंघाला पाठिंबा देऊन राज्यभरात त्यांची मतं मिळवायची, असा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.Loading…
Loading...