सपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीने आघाडी केल्यानंतर आता कॉंग्रेसने उत्तरप्रदेशमधील लोकसभेच्या सर्व ८० जागांवर निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे उत्तरप्रदेशातील राजकारणाचा पार दिवसेंदिवस चांगलाच वाढताना दिसत आहे.

कॉंग्रेसचे महासचिव व प्रदेश प्रभारी गुलाम नबी आजाद पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, कॉंग्रेस सर्व ८० जागा लढवणार आहे.तरी छोट्या पक्षांना अजूनही रस्ते खुले असल्याचे त्यांनी सांगितले.पुढे बोलताना म्हणाले, आमची तयारी पूर्ण झाली आहे.निकाल आश्चर्यजनक लागणार हे निश्चित आहे.रालोद किंवा शिवपाल यांच्याशी काही बोलणे झाले का या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.त्यासोबत त्यांनी निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण असेल या प्रश्नाचे उत्तरही देण्याचे टाळले.

लखनऊमध्ये उत्तर प्रदेश कॉंग्रेसच्या कार्यालयात उत्तर प्रदेशचे प्रभारी तथा राज्यसभा सदस्य गुलाब नबी आझाद बोलत असताना म्हणाले,या आघाडीने आमच्यावर कसलाही फरक पडत नाही.उत्तर प्रदेशमध्ये आम्ही ८० जागांवर लढण्यासाठी तयारी सूरु केली आहे.देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला एक ठेवले होते. कॉंग्रेस त्याच रस्त्यावर चालत आहे.आम्ही कोणतेही काम सकारात्मक भावना ठेऊन करतो.जर कुणी आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागत आहे. पण जर कुणी आमच्यावर दबाव निर्माण करत असेल तर आमच्यावर काही फरक पडत नाही.