मोदींच्या गुजरात मधे भाजप ‘बेहाल’

वेबटीम:- गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या रात्री उशीरापर्यंत चाललेल्या मत मोजणी नंतर अखेर या महत्वाच्या लढाईत काँग्रेसने भाजपवर मात केली आहे. काँग्रेसच्या अहमद पटेल यांनी बलवंतसिंह राजपूत यांचा पराभव केला असून त्यांना ४४ मते मिळाली. गुजरातमधील तीन जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये वाकयुद्ध पाहायला मिळाले. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महत्वपूर्ण लढाईत अखेर काँग्रेसने बाजी मारली आहे. अहमद पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेसने जोरदार झुंज दिली होती. या विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण पाहायला मिळाले. काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला विजय मिळवण्यात यश आल्याने पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

प्रतिष्ठेच्या या लढाईत कॉंग्रेसचे अहमद पटेल यांनी बाजी मारली आहे. पटेल यांना विजयासाठी आवश्यक असलेली ४४ मते मिळाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असलेल्या अहमद पटेल यांचा पराभव करून गुजरात काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीआधी खच्चीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसने शेवटपर्यंत किल्ला लढवत भाजपला जोरदार धक्का दिला. त्यामुळे कॉंग्रेसचे खच्चीकरणकरू पाहनारा भाजपा मात्र चांगलाच बैकफूट वर गेलेले पाहायला मिळाल.