उर्जित पटेल यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की

कोलकाता: रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना कोलकाता एअरपोर्टवर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना एअरपोर्टवर काळे झेंडे दाखवून नोटाबंदीविरोधात घोषणा देण्यात आल्या. नोटाबंदीला विरोध असल्याने कार्यकर्त्यांकडून हे कृत्य करण्यात आल्याचं समजतंय. उर्जित पटेल एअरपोर्टवर पोहचताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ते कारमधून उतरताच कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले. मात्र पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेळीच रोखलं.

पोलिसांनी कार्यकर्त्यांना उर्जित पेटल यांच्यापासून दूर ठेवलं. मात्र कार्यकर्त्यांनी नोटाबंदीचा विरोध काळे झेंडे दाखवून व्यक्त केला. नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची भेट घेतली. या बैठकीत दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. बैठक आटपून उर्जित पटेल कोलकाता विमानतळावर आले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला.