शत्रुघ्न सिन्हा यांची उमेदवारी रद्द करण्याची कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी

टीम महाराष्ट्र देशा- शत्रुघ्न सिन्हा हे राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादवांचे दलाल आहेत, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या उमेदवारीवर नाराज असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका गटाने पाटण्यातील काँग्रेस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं आहे. सिन्हा यांची उमेदवारी रद्द करावी, अशी या गटाची मागणी आहे.

Loading...

राजदच्या सांगण्यावरून सिन्हा यांना उमेदवारी मिळाली आहे. तसंच बिहार प्रदेश काँगेस समिती (बीपीसीसी)चे अध्यक्ष मदन मोहन झा, पक्षाचे नेते शक्ती सिंह गोहिल आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह या तिघांनी मिळून ही सीट विकली आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा हे लालू प्रसाद यादव यांचे दलाल आहेत, असा आरोप करत या कार्यकर्त्यांनी सोमवारी पाटण्यातील काँग्रेस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.

तब्बल तीन दशकांहून अधिक काळ भाजपसोबत राहिलेले शत्रुघ्न हे सध्या पाटना साहिब मतदारसंघाचे खासदार आहेत. ७२ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा याच जागेसाठी इच्छुक होते; परंतु त्यांच्या जागी भाजपने रवी शंकर यांना उमेदवारी दिली.यानंतर भाजपमधून बाहेर पडून शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसची वाट धरली. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी पटना साहिब इथून तिकीटही मिळालं. पण, काँग्रेसचे काही कार्यकर्ते सिन्हा यांच्या उमेदवारीवर नाराज असल्याने अडचणी आता वाढणार आहेत.

 Loading…


Loading…

Loading...