कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलबाहेर युवक काँग्रेसची निदर्शने

मुंबई : कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय नाट्याचे पडसाद आता मुंबईत उमटले आहे. आमदारकीचा राजीनामा देणारे कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये वास्तव्यास असून, या हॉटेलबाहेर आज काँग्रेसच्या कार्यकत्यांनी जोरदार निदर्शने केली.

Loading...

यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजीही केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सूरज सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा नवा अंक आता सुरू झाला आहे. काँग्रेसच्या १० तर जनता दल सेक्युलरच्या तीन नाराज आमदारांनी शनिवारी विधासभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यापैकी ११ आमदारांची मुंबईतील एका आलिशान हॉटेलात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.Loading…


Loading…

Loading...