‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’

nana patole

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते निष्क्रिय असतील तर एनएसयुआयने पुढे येऊन काँग्रेस पक्षाचे काम हाती घ्यावे. यापुढे पक्षाला फक्त काम करणाऱ्याची किंमत राहील. निष्क्रिय नेत्यांची पक्षाला गरज नसल्याचा इशारा महाराष्ट्र एनएसयुआय व युवक काँग्रेसचे प्रभारी तथा प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी दिला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यातील सर्व एनएसयूआय जिल्हाध्यक्षांची ऑनलाइन बैठक पार पडली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन केले. ऑनलाईन बैठकीला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील इत्यादींची उपस्थिती होती.तीन तास चाललेल्या बैठकीत प्रदेशाच्या नेत्यांनी एसएसयुआय जिल्हाध्यक्षांचा आढावा घेतला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी जिल्हाध्यक्षांशी संवाद साधताना प्रत्येकाने स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेऊन पक्ष व संघटनेचे काम करा. येणारा काळ अतिशय कठीण आहे. नागरिकांना आवश्यक ती मदत काँग्रेस पक्ष व संघटनेच्या वतीने करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या

IMP