fbpx

कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मुजोरी, रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकारांना केली बेदम मारहाण

चेन्नई : सर्वसाधारणपणे सत्तेत असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते मुजोरपणे वागतात अशी समजूत आहे. मात्र विरोधात असणाऱ्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मुजोरी तामिळनाडूमध्ये पहायला मिळाली. काँग्रेसने आयोजित केलेल्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली. त्यावेळी काही छायाचित्रकार रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढत होते. छायाचित्रकारांनी काढलेले फोटो व्हायरल झाले तर बदनामी होईल या भीतीने चक्क काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छायाचित्रकारांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत असून, या व्हीडिओत काँग्रेसचे कार्यकर्ते पत्रकारांना मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ तामिळनाडूच्या विरुधुनगर येथील आहे. याठिकाणी काँग्रेसने आयोजित केलेल्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली. त्यावेळी काही छायाचित्रकार रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढत होते. ही गोष्ट न रुचल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या छायाचित्रकारांना मारहाण करायला सुरुवात केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोघांच्याही सभांना गर्दी कमी असल्याचे पहायला मिळत आहे. बदलते हवामान,सभांचे टायमिंग,नियोजनाचा अभाव,मित्रपक्षांची नाराजी अशी विविध कारणे यापाठीमागे असल्याचे बोलले जात आहे. मात्र सत्य दाखविणाऱ्या छायाचित्रकारांवर अश्या पद्धतीने हल्ला करून कॉंग्रेस नेमका काय संदेश देऊ पाहतेय असा देखील सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.