‘महात्मा गांधींवर चौथी गोळी नागपूरच्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने झाडली’

nathuram-gandhi

टीम महाराष्ट्र देशा- देशात लोकसभा निवडणुकांमध्ये विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी असणे अपेक्षित असताना देशात इतिहासावरून निवडणूक प्रचारामध्ये चिखलफेक सुरु आहे. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू असून त्याच नाव नथुराम गोडसे आहे, असे वक्तव्य करत अभिनेता कमल हसनने केले होते यावरून मोठा वादंग माजला आहे.

कमल हसन यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी सारवासारव देखील केली होती मात्र हा वाद मिटेल असे वाटत असताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील. त्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करावे, अशा लोकांना लोकसभा निवडणुकीत उत्तर मिळेल असं विधान केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.

Loading...

एका बाजूला या सर्व घडामोडी घडत असताना आता या प्रकरणात हिंदू महासभेने उडी घेतली आहे. महात्मा गांधींवर चौथी गोळी नागपूरच्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने झाडली होती, असा खळबळजनक दावा हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते पंडित प्रमोद जोशी यांनी केला आहे.दैनिक प्रहाराने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

नथुराम गोडसे यांच्याकडे इटालियन मिलिटरीत वापरले जाणारे माऊझर कुणी आणून दिले, हा महत्वाचा प्रश्न आहे. चौथ्या गोळीबद्दल सगळे शांत राहतात. परंतु चौथी गोळी झाडली गेली होती. मला स्वतःला गोपाळराव गोडसे यांनी त्याबद्दल सांगितले. त्याचे नावसुद्धा मला माहित आहे. तो नागपूरचा काँग्रेस कार्यकर्ता होता, हे सुद्धा मी आज जाहीर करतो, असे खळबळजनक वक्तव्य प्रमोद जोशी यांनी केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपचा 'हा' डॅशिंग आमदार उतरला मैदानात
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील