राजस्थानमध्ये भाजपचे ‘बजेट’ कोलमडले; लोकसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा विजय

टीम महाराष्ट्र देशा: एका बाजूला २०१९ च्या निवडणूकीच टार्गेट ठेवून आज मोदी सरकारचा अर्थसंकल्प मांडला जात आहे. तर दुसरीकडे राजस्थानमध्ये भाजपच्या विजयाचे ‘बजेट’ कोलमडले आहे. कारण अजमेर आणि अलवर या लोकससभेच्या जागासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.

bagdure

अजमेरमधून कॉंग्रेस उमेदवार रघु शर्मा तर अलवरमधून कर्ण सिंह यादव हे विजयी झाले आहेत. तर विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत टीएमसी विजयी झाली आहे. दरम्यान आज लागलेले निकाल हे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. तर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून वसुंधराराजे यांनी राजीनामा देण्याची मागणी सचिन पायलट यांनी केली आहे.

You might also like
Comments
Loading...