लोकसभा २०१९ : नगरमध्ये कॉंग्रेसचा सुजय विखेंना पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्र्वादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना चांगलाच फटका बसलाय तर भाजपच्या सुजय विखे यांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक तोंडावर असतानाचं नगरमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला नगरमध्ये फटका बसणार आहे

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा देत असल्याचं अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी जाहीर केलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संग्राम जगताप यांनी आमचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे स्थानिक नेते त्यांच्यावर नाराज आहेत.

त्याचवेळी सुजय विखेंनी आमचा प्रचार करुन आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. ज्या माणसाने आम्हाला पाठींबा दिला, आमच्यासाठी प्रचार केला त्यांनाच आम्ही मदत करणार असल्याचं बाळासाहेब हराळ यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.