अर्थव्यवस्थेविषयी सरकारला जाब विचारण्यासाठी कॉंग्रेस देशभरात आंदोलन करणार

blank

टीम महाराष्ट्र देशा – भारतीय अर्थव्यस्था सध्या संकटात आहे. भारताचा विकासदर कमी झालेला आहे. तसेच भातात सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे देश संकटात आहे. या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आंदोलन करणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर कॉंग्रसने पक्षसंघटनेत बदल केला आहे. अनेक ठिकाणचे पदाधिकारी त्यांनी बदलले आहेत. तसेच तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस थोडी कमकुवत झाली होती. परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून कॉंग्रेस पुन्हा एकत्र येत आहे.

या आंदोलनाचा मुख्य मुद्दा हा घसरती अर्थव्यवस्था असणार आहे. याविषयी कॉंग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. या आंदोलनानंतर संसदेचे हिवाळी अधिवेशन १८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या काळात होणार आहे. तेव्हाही काँग्रेससह विरोधकांकडून सरकारला अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून घेरले जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या