गोव्यात राष्ट्रवादीने घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे कॉंग्रेसला मोठा झटका

गोव्यात राष्ट्रवादीने घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे कॉंग्रेसला मोठा झटका

Sharad Pawar

गोवा (पणजी): गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याची देखील भाषा केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील आता पुढचे पाऊल घेतले असल्याचे स्पष्ट होत आहे. याचाच प्रत्यय गोव्याच्या निवडणुकांमध्ये दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रासारखीच परिस्थिती आता गोव्यात देखील बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील एक गट अरविंद केजरीवलांच्या (Arvind Kejriwal) आम आदमी पार्टी (AAP) सोबत युती करण्याच्या विचारात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याच सोबत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल कॉंग्रेस (TMC) सोबत देखील युती करण्याच्या तयारीत असल्याचे तेथील काही नेत्यांकडून समजत आहे.

राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सांगितलं, आम्ही ऐकले आहे की गोव्यातील काँग्रेस नेते त्यांच्या निवडणुकीच्या रणनीतीवरुन आपसात वाद घालत आहेत आणि AICC आतापर्यंत ते वाद सोडवण्यात असमर्थ राहिली आहे. राष्ट्रवादीने खूप वाट पाहिली आहे, पण आम्ही अंतहीन वाट पाहू शकत नाही. पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाओ यांच्यासह गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी टीएमसीसोबत युतीसाठी चर्चेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, शरद पवार (Sharad Pawar) भाजपविरोधी आणि बिगर काँग्रेस तिसरी आघाडी करण्याची शक्यता आहे. ज्यात TMC, AAP, NCP आणि इतरांचा समावेश असेल.

महत्वाच्या बातम्या: