fbpx

कॉंग्रेसच ठरल; हे असतील संभाव्य उमेदवार?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उमेदवारांची चाचपणी करण्यात आली आहे. या बैठकीत २६ मतदारसंघांतील उमेदवाराबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहे. मुंबई मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. २६ लोकसभा मतदारसंघांपैकी काही जागा वादग्रस्त असून तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेते पुन्हा एकदा बैठक घेणार आहेत. औरंगाबाद, पुणे यासह काही जागांवरील उमेदवारांच्या नावावर पुन्हा चर्चा होणार आहे. अंतिम निर्णयासाठी ही यादी दिल्लीला पक्षनेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहे.

संभाव्य उमेदवार
सोलापूर – सुशीलकुमार शिंदे
नागपूर – विलास मुत्तेमवार किंवा नाना पटोले
चंद्रपूर – देवतळे किंवा आशिष देशमुख
शिर्डी – भाऊसाहेब कांबळे
नंदुरबार – के सी पाटील
वर्धा – चारुलता टोकस
दक्षिण मुंबई – मिलिंद देवरा
यवतमाळ – माणिकराव ठाकरे
नांदेड – अमिता चव्हाण