‘भाजपने माधुरीचं काय कोणीही उमेदवार दिला तरी विजय काँग्रेसचाच होणार’ : जोशी

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात राज्यातील पुणे लोकसभा मतदारसंघ चांगलच चर्चेत आला आहे. आधी शरद पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. मात्र शरद पवार यांनी त्यातून हवा काढून घेतल्यानंतर या चर्चांना पूर्ण विराम मिळाला.

मात्र, भाजपकडून आता नवी खेळी खेळत आपले ‘ट्रम्प कार्ड’ बाहेर काढल्याची चर्चा आहे. आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजप सेलिब्रिटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपने देशव्यापी सर्वेक्षण सुद्धा केले आहे. या सर्वेक्षणानुसार बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र ‘मिड डे’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे.

Rohan Deshmukh

दरम्यान, पुणे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी यासंदर्भात ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे. लढाईमध्ये शत्रू कोणीही असो विजय मिळवण्यासाठी आम्ही तयारी सुरु केलीआहे. भाजपने उमेदवारी माधुरी दीक्षित यांना दिल्याने आमची लढाई सोपी होईल असं काही नाही. विजय मिळविण्याच्या दृष्टीने आम्ही अतिशय नियोजनबद्धरीत्या व्यूहरचना आखत असून भाजपने उमेदवार कोणीही दिला तरी विजय काँग्रेस पक्षाचा होणार हे निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘मिड डे’च्या वृत्तानुसार, 2019 साली भाजपकडून माधुरी दीक्षितला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. माधुरीसाठी मुंबई आणि पुण्यातील मतदारसंघांची चाचपणी झाली. त्यात पुण्यातून माधुरीला लोकसभेसाठी उतरवलं जाण्याची शक्यता अधिक आहे. भाजपचे कट्टर कार्यकर्ते, काहीशे तटस्थ आणि भाजपविरोधक अशा मतदारांकडून भाजपने या सर्वेक्षणाअंतर्गत मतं जाणून घेतली आहेत.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...