खातेवाटप : कॉंग्रेसला उपमुख्यमंत्री पद, राष्ट्रवादीचा होणार विधानसभा अध्यक्ष

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले आहे. मात्र अजूनही महाविकासआघाडीतील मंत्रिपदाचे वाटप कशा पद्धतीने होणार यामध्ये संभ्रम कायम आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मंत्रीपादाबाबत धुसफूस सुरु होती. तर सूत्रांच्या माहितीनुसार आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने चर्चा करून सुवर्ण मध्य काढत खातेवाटपाचा तिढा सोडवला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार कॉंग्रेसला विधानसभा अध्यक्ष पदाच्या ऐवजी उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला विधानसभा अध्यक्ष पद देण्यात आले आहे. दोन्ही पक्षांनी उपमुख्यमंत्री पद आणि विधानसभेचे अध्यक्ष पदावरून एकमेकांवर दबाव टाकण्यास सुरवात केली होती. मात्र दोन्ही पक्षांनी सामंजस्य दाखवत हा तिढा सोडवला आहे.

कॉंग्रसने विधानसभा अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे केले होते. तर राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर आक्षेप घेतला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री पदी अजित पवारांना विराजमान करणार असल्याचं म्हंटल होत. तर यावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यामुळे एकमेकांवर दबाव टाकत दोन्ही पक्षांनी खातेवाटपाचा तिढा वाढवला होता. मात्र यावर पक्ष श्रेष्ठींना तोडगा काढण्यात यश आले आहे. कॉंग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान बुधवारी झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षपद घेण्यास नकार दिला. बाळासाहेब थोरातांना याबाबत त्यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीने हे पद स्वीकारु नये, प्रोटोकॉलनुसार या पदाची उंची मुख्यंमंत्र्यांपेक्षा कमी असते. त्यामुळे याचा परिणाम चव्हाणांच्या राजकीय वाटचालीवर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी अध्यक्ष पद भूषवण्यास नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...