कर्नाटक निवडणुकीमध्ये कॉंग्रेस १ नंबर राहील, संजय राउत यांची भविष्यवाणी

Sanjay-Raut

टीम महाराष्ट देशा: कर्नाटकामध्ये निवडणुकीमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, निवडणुकीला जेमतेम एक आठवडय़ाचा कालावधी राहिलेला असतानाच शिवसेना नेते संजय राउत यांनी भाकीत वर्तवलंं आहे.

संजय राउत म्हणाले ,कर्नाटकमध्ये कॉंग्रेस १ नंबर राहील. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत जरी आम्ही भाजप सोबत युती केली असेल. मात्र याचा अर्थ २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील आम्ही युती करू असा होत नाही.

ते पुढे म्हणाले, ज्याठिकाणी निवडणुका असतात त्याठिकाणी केंद्रातील भाजपची टीम प्रचारासाठी दाखल होते आणि या काळात देशाला वाऱ्यावर सोडल्या जाते. हे सर्व देशातील जनता पाहत आहे. तसेच महाराष्ट्रात २०१९ मध्ये शिवसेना बहुमताने विधानसभेवर भगवा फडकावणार असा विश्वास संजय राउत यांनी व्यक्त केला.