इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला देशभर आंदोलन करणार

कॉंग्रेस

मुंबई – लागोपाठ महाग होत असलेल्या पेट्रोल-डिझेलचे  दर सध्या शहरांमध्ये विक्रमी पातळीवर पोहचले आहे. मुंबईत पेट्रोल (petrol) 102 रुपये लीटरच्या जवळ पोहचले आहे. तर काही शहरात हा आकडा सुद्धा पार केला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एक दिवसानंतर पुन्हा इंधनाच्या दरात वाढ केली आहे. आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या दरात सुद्धा 25 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर मंगळवारी स्थिर राहिल्यानंतर बुधवारी पुन्हा नव्या विक्रमी पातळीवर गेले. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल 25 पैशांनी आणि डिझेल 27 पैशांनी महागले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या अग्रगण्य तेल विपणन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय राजधानीत बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 25-25 पैशांनी वाढून अनुक्रमे 95.56 आणि 86.47 रुपये प्रतिलिटर झाले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 4 मेपासून आतापर्यंत 21 दिवस वाढविण्यात आल्या आहेत, तर उर्वरित 16 दिवसांच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या काळात दिल्लीत पेट्रोल 5.16 रुपयांनी तर डिझेल 5.74 रुपयांनी महागले आहे.

दरम्यान, इंधन दरवाढीविरोधात आतांबकाँग्रेस आक्रमक झाली आहे. येत्या ११ जूनला काँग्रेस देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर आंदोलन करणार आहे.गेले काही दिवस काँग्रेसचे नेते सातत्याने इंधन दरवाढीवरून केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. दरम्यान, काँग्रेस येत्या ११ जूनला देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर आंदोलन करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP