पुण्याच्या लोकसभेच्या जागेवरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा

मुंबई : पुण्याची लोकसभेची जागा प्रत्येक निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी या ना त्या कारणाने येत असते. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. कॉंग्रेसच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या अश्या या जागेवर राष्ट्रवादीने आपला हक्क सांगत राजकीय रस्सीखेच स्पर्धेला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना पुण्याच्या जागेची मागणी केली होती. गेल्या 10 वर्षांमध्ये पुणे महापालिकेत राष्ट्रवादीने केलेली कामे, पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी केलेलं काम पाहता ही जागा आपल्याकडेच असावी असं कार्यकर्त्यांना वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच या ठिकाणाहून निवडणूक लढवावी अशी देखील मागणी काकडे यांनी केली होती.

यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काकडे यांना चिमटा काढला. जागा वाटपाची चर्चा प्राथमिक स्वरूपात आहे. जेव्हा सगळे ज्येष्ठ नेते चर्चेला बसतील, त्या वेळी या सगळ्या विषयांची चर्चा होईल. मात्र, अन्य कोणाच्या मागण्यांवर मला काहीही बोलायचे नाही. आघाडी होणार आहे, पण ज्यांचा या चर्चेशी संबंध नाही अशांनी त्यात नको ती विधाने करून बाधा आणू नये, असा टोला चव्हाण यांनी अंकुश काकडे यांना लगावला.

‘मी अजित अनंतराव पवार, काटेवाडीचा बूथ प्रमुख…’

भाजप शिवसेनेला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय जनसंघर्ष थांबणार नाहीः अशोक चव्हाण