मोदींची शेतकऱ्यांना सावत्र भावासारखी वागणूक – राहुल गांधी

Modi vs rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा: मोदींच्या गुजरातमध्ये अन्नदाताच बेरोजगार झाला असून शेतकऱ्यांना सावत्र भावासारखी वागणूक का दिली जाते, असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.

ज्या सोशल मीडियामधून भाजपने आपली सत्ता स्थापन केली त्याच सोशल मीडियामधून राहुल गांधी यांनी पंतप्रधांना टार्गेट करायला सुरवात केली आहे. राहुल गांधी दररोज ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारला प्रश्न विचारतात. गुरुवारी राहुल गांधी यांनी ९ वा प्रश्न विचारला. न की कर्ज़ माफ़ी, न दिया फसल का सही दाम, मिली नहीं फसल बीमा राशि, न हुआ ट्यूबवेल का इंतजाम, खेती पर गब्बर सिंह की मार, छीनी जमीन, अन्नदाता को किया बेकार, PM साहब बतायें, खेडुत के साथ क्यों इतना सौतेला व्यवहार? असे ट्विट त्यांनी केले आहे.