आप चौकीदार थे या भागीदार? राहुल गांधीचा मोदीना थेट सवाल.

congress-vp-rahul-gandhi-asks-pm-narendra-modi-speak-up-on-jai-shah-case

‘द वायर’ या न्यूजवेबसाईटने अमित शहा यांचे पुत्र जय यांच्या ‘टेम्पल इंटरप्रायझेस लिमिटेड’ या कंपनीशी संबंधित वृत्त दिल्याने देशभरात खळबळ निर्माण झाली आहे. कंपनी निबंधकाकडे केलेल्या नोंदणीनुसार जय शहा यांच्या कंपनीने नफा कमवायला सुरुवात केल्याचे वृत्तात म्हटले होते. कंपनीला मार्च २०१३, मार्च २०१४ मध्ये अनुक्रमे ६, २३० रुपये आणि १, ७२४ रुपयांचा तोटा झाला होता. तर २०१४-१५ मध्ये १८ हजार रुपयांचा नफा झाला. मात्र २०१५- १६ मध्ये कंपनीची उलाढाल ८० कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कागदपत्रांवरुन उघड झाले.
जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात १६ हजार पटींनी वाढल्याचे समोर आल्यानंतर काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि अन्य विरोधी पक्षांनी अमित शहांना लक्ष्य केले आहे. कॉंग्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. राहुल गांधीच्या ऑफिशल ट्वीटर अकांऊटवरून राहुल यांनी मोदींना थेट एक प्रश्न केला आहे. मोदीजी, जय शाह- ‘जादा’ खा गया. आप चौकीदार थे या भागीदार? कुछ तो बोलिए. असा प्रश्न करीत राहुल गांधीने मोदीना लक्ष केले आहे.