काँग्रेसचे सर्व मतदार जगदाळे यांनाच मतदान करतील – धनंजय मुंडे

बीड – रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. कराड यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे आता राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. दरम्यान कॉंग्रेसचा जगदाळे यांना पूर्ण पाठींबा असून, काँग्रेसचे सर्व मतदार जगदाळे यांनाच मतदान करतील , एकही मतदान इकडे तिकडे जाणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

काहीदिवसांपूर्वी रमेश कराड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देखील दिली होती.कराड यांना लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमदेवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून सुरेश धस यांना उमदेवारी मिळाली होती. गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून विधानपरिषदेचं तिकीटही दिले होते. मात्र कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत.Loading…
Loading...