fbpx

सहारा समुहाने मोदींना ६ महिन्यांत ४० कोटी दिले- राहुल गांधी

rahul

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना नरेंद्र मोदी यांना सहारा समुहाकडून सहा महिन्यात तब्बल ४० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप राहुल गांधीनी केला आहे. सहारा समुहावर आयकर विभागाने २०१४ मध्ये धाड टाकली असताना तिथे काही कागदपत्र आढळले होते. यावरुन हा खुलासा झाला होता. या सगळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

मेहसाणामधील सभेत राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहारा समुहाकडून त्यांना सहा महिन्यात ९ वेळा पैसे मिळाले. मोदींना कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला पैसे मिळाले याची आकडेवारीच त्यांनी सादर केली आहे. इतकेच नव्हे तर बिर्ला समुहावरील छाप्यात आयकर विभागाला एक डायरी आढळली होती. यात गुजरात सीएम २५ कोटी असा उल्लेख आढळला होता. आयकर विभागाकडे गेल्या अडीच वर्षांपासून ही सर्व माहिती आहे. पण अद्याप त्यावर कारवाई झाली नाही. आता या सर्व आरोपांची चौकशी करणे गरजेचे आहे असे गांधी यांनी सांगितले.

नोटाबंदीवरुनही राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदींनी शेतक-यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला. देशातील कामगारवर्ग देश घडवतो, पण मोदींनी त्यांच्यापासून मनरेगा ही योजना हिरावून घेतली अशी टीका त्यांनी केली.