कॉंग्रेस सावरकर विरोधी नाही, मात्र काही वैचारिक मतभेत आहेत : मनमोहन सिंह

manmohan sing

टीम महाराष्ट्र देशा : ” कॉंग्रेस सावरकर विरोधी नाही. असे विधान माजी पंतप्रधन मनमोहन सिंह यांनी केले आहे. ” सावरकरांबद्दल आम्हाला आदरच आहे मात्र काही वैचारिक मतभेत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. सिंह यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत त्यांनी वीर सावरकरांन भारतरत्न देण्याच्या मुद्य्याला विरोधाचे स्पष्टीकरण दिले.

सिंह म्हणाले, ” माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच वीर सावरकर यांच्या नवे टपाल तिकिट सुरु केले. तसेच भा रतरत्न कोणाला द्यायचे हे एक समिती ठरविते. त्यामुळे आम्हाला वीर सावरकर यांच्याबद्दल आदरच आहे. ” विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले संकल्पपत्र प्रकाशित केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्नसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या नेत्यांनी सावरकरांचा उल्लेख गांधीजींच्या  हत्येचा कट रचणारा म्हणून करत त्यांना भारतरत्न देण्याला विरोध केला.

भाजपच्या संकल्पपत्रातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मुद्द्यावर कॉंग्रेससह समाजवादी पत्रीचे अबू आझमी यांनी विरोध केला आहे. सावरकरांना भारतरत्न देणार असाल तर भगतसिंह यांनादेखील भारतरत्न देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमार यानं सावरकरांना भारतरत्न देणे म्हणजे भगतसिंह यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल. ” असं म्हणत विरोध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :