“गौरी लंकेश हत्या प्रकरणात हिंदू तरुणांना अडकवण्याचा काँग्रेसचा कट”

gauri lankesh हत्या

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच काँग्रेसने हिंदू तरुणांना गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केली असून पुरोगामी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात कर्नाटक सरकारला अपयश आल्याने हि कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप भाजपा खासदार शोभा करंदलाजे यांनी केला.

काही दिवसांपूर्वी गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) नवीन कुमार या हिंदू युवा सेनेशी संबंधित व्यक्तीला अटक केली होती. कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पदयात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत सोमवारी भाजपा नेत्यांनी सत्ताधारी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.

शोभा करंजदाले यांचा आरोप

खासदार शोभा करंजदाले यांनी कर्नाटक सरकारला चांगलेच धारेवर धरलं.एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात कर्नाटक सरकारला अपयश आले. दोन वर्षांनंतरही मारेकरी फरार आहेत. आता काँग्रेसने हिंदू तरुणांना गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही कारवाई करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.