सोनम कपूरचे आभार मानने कॉंग्रेसला पडले महागात, नेटिझन्सने उडवली खिल्ली

मुंबई- सध्या सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवरवर काँग्रेस पक्षाला एका वेगळ्याच कारणासाठी ट्रोल केलं जातंय. सोनम कपूरला ट्विटवर थँक्यू बोलल्याने काँग्रेस पक्ष युजर्सच्या निशाण्यावर आला आहे. अभिनेत्री सोनम कपूरने गुरूवारी काँग्रेस पक्षाला ट्विटरवर फॉलो केलं. काँग्रेस पक्षाला ट्विटरवर फॉलो केल्याने पक्षाकडून सोनम कपूरचे आभार मानण्यासाठी धन्यवादचा मेसेज काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आला. याच ट्विटमुळे काँग्रेसला नेटिझन्स ट्रोल करत आहेत.

कॉंग्रेसचा रिप्लाय

‘धन्यवाद सोनम कपूर. तू सुंदर आणि प्रेरणादायी आहेस. वीर दी वेडिंग सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहोत, अजून वाट नाही पाहू शकत, असं ट्विट काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलं.

राजकीय पक्ष आता सिनेमांचं प्रमोशन करायला लागली आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. काँग्रेस पक्षाला ट्विटवर इतरही अनेक जण फॉलो करतात. सगळ्यांना धन्यवाद न देता सोनम कपूरसाठी ट्विट केलं. काँग्रेस पक्ष लोक बघून आभार मानता का? असा प्रश्नांचा भडीमार नेटिझन्सकडून केला जात आहे.

 

काँग्रेसच्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवरून हे ट्विट येताच लोकांनी कमेन्ट करायला सुरूवात केली व काँग्रेसला ट्रोल करायला सुरूवात केली. फक्त काँग्रेसलाच नाही तर सोनम कपूरलाही ट्रोल करण्यात आलं. एक सारख्या आयक्यू लेव्हलची लोक एकमेकांना फॉलो करतात, असं नेटिझन्सने म्हंटलं.

काँग्रेसला ट्रोल करताना अनेक युजर्सने म्हंटलं की, काँग्रेसला आता एक अॅक्टिंग स्कूल सुरू करायला हवी.

काँग्रेसच्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवरून झालेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर युजर्सने बोलायची एकही संधी सोडली नाही. लोकांनी टीका तर केली त्याबरोबर काँग्रेसचा स्वभाव असाच असल्याचं अनेकांनी म्हंटलं.

You might also like
Comments
Loading...