सोशल मिडीयावर सक्रिय असाल तरच मिळणार कॉंग्रेसचे तिकीट

टीम महाराष्ट्र देशा : मध्य प्रदेशमध्ये १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाला हादरा देण्यासाठी कॉंग्रेसकडून अतोनात प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भाजपला रोखण्यासाठी त्यांच्या आयटी सेलला टक्कर देणे तितकच गरजेच असल्याने कॉंग्रेसकडून सोशल मीडियावर सक्रिय असणे ही तिकीट वाटपातील प्रमुख अट ठेवली आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार काँग्रेसने उमेदवारी देताना सोशल मीडियासंदर्भात तीन प्रमुख अटी ठेवल्या आहेत.

या आहेत तिकीट वाटपाच्या प्रमुख अटी – 

१. उमेदवाराचे फेसबुकवर स्वतःचे पेज आणि ट्विटरवर अकाऊंट असले पाहिजे. तसेच त्याच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या आणि बूथ लेव्हल कार्यकर्त्यांच्या व्हॉट्स अॅपग्रुपमध्ये त्यांचा समावेश असला पाहिजे.

२. ट्विटरवर ५ हजार फॉलोअर्स आणि फेसबुकवरील पेजला १५ हजार लाईक असले पाहिजे.

३. सोशल मीडियावर फक्त सक्रिय असून चालणार नाही. मध्य प्रदेश काँग्रेसने फेसबुक आणि ट्विटरवर केलेली प्रत्येक पोस्ट शेअर अथवा रिट्विट बंधनकारक आहे. याशिवाय इच्छुक उमेदवाराने १५ सप्टेंबरपर्यंत सोशल मीडियावरील कामगिरीचा अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

उमेदवारी देताना अन्य गोष्टींचाही विचार केला जाईल, मात्र सोशल मीडिया ही देखील महत्त्वाची अट असेल, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.