पीयूष गोयल यांच्याकडून मंत्रिपदाचा दुरुपयोग ; कॉंग्रेसचा गंभीर आरोप

टीम महाराष्ट्र देशा : ”मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व कॅबिनेट मंत्री व त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची माहिती ४८ तासांमध्ये देण्यास सांगितली होती. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली मात्र यातील महत्त्वपूर्ण तथ्यं लपवून ठेवली. व्यावसायिक संबंध त्यांनी सार्वजनिक केलेले नाहीत” असा आरोप काँग्रेस प्रवक्ता पवन खेडा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर केला आहे.

Loading...

तसेच पीयूष गोयल यांना ऊर्जामंत्रिपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर विवादाची परिस्थिती निर्माण झाली होती. जेथे त्यांनी संशयास्पद व्यावसायिक करार केले होते. असा आरोप सुद्धा पवन खेडा यांनी केला आहे. आतापर्यंत भाजपच्या गोटातून यावर काही प्रतिक्रिया आली नसली तरी भाजप यावर काय स्पष्टीकरण देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.Loading…


Loading…

Loading...