पांढऱ्या दाढीचा वृद्ध माणूस टीव्हीतून तुमच्या घरात शिरतो आणि पैसे पळवतो; कॉंग्रेसची पंतप्रधानांवर टीका

टीम महाराष्ट्र देशा: जगभरात नाताळाची धूम आहे. सांताक्लॉजकडे गिफ्ट मागण्यात लहानगे मंडळी गुंग आहेत पण भारतात मात्र सांताक्लॉजच्या वेषावरून आता थेट पंतप्रधानावरच निशाना साधला आहे. कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनी एक ट्विट नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

सध्या संपूर्ण जगात पांढऱ्या दाढीचा म्हातारा माणूस नकळतपणे लोकांच्या घरात जाऊन त्यांच्या मोज्यात पैसे आणि भेटवस्तू ठेवत आहे. मात्र, भारतातील परिस्थिती याउलट आहे. येथे पांढऱ्या दाढीचा वृद्ध माणूस टीव्हीतून तुमच्या घरात शिरतो. घरात शिरल्यानंतर तो लोकांची पाकिटं, कपाट, लॉकर सर्व ठिकाणचे पैसे काढून घेतो. त्यामुळे तुमच्या अंगावर फक्त मोजेच (सॉक्स) शिल्लक राहतात अशा आशयाच ट्विट करून कॉंग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.