आघाडीत येण्यासाठी मनसेकडून कुठलाच प्रस्ताव नाही – थोरात

टीम महाराष्ट्र देशा: सत्ताधारी भाजपच्या विजयाचा अश्व रोखण्यासाठी कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. मात्र दुसरीकडे दोन्ही पक्षातील अनेक दिग्गज भाजप – शिवसेनेत प्रवेश करत आहेत, अशावेळी सर्व विरोधकांची मोट बंधने दोन्ही कॉंग्रेसला गरजेच आहे.

राज ठाकरे यांचा पक्ष मनसेला आघाडीत घेण्याची मागणी केली जात आहे. परंतु आघाडीबाबत मनसेकडून कोणताच प्रस्ताव अद्याप आला नाही, असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.एका मराठी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हि माहिती दिली.

राज ठाकरे यांचा पक्ष आघाडीत येण्याची शक्यता नाही, आघाडीत येण्यासंदर्भात राज ठाकरेंकडून यांच्याकडून किंवा आमच्याकडूनही काही प्रस्ताव दिला नाही. किंबहुना, मनसेच्या संदर्भात अजून तशी काही चर्चाच झाली नाही. असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आमची भूमिका आहे, परंतु राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, अशी मागणी वंचितने केली आहे, हे शक्य नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे भाजप-शिवसेनेचा फायदा, हे लोकांना कळालं आहे. असं थोरात म्हणाले.